yuva MAharashtra धनगांव बुरुंगवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा अ‍ंदोलन... धनगांव ग्रामस्थांचा ईशारा....

धनगांव बुरुंगवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा अ‍ंदोलन... धनगांव ग्रामस्थांचा ईशारा....



धनगांव बुरुंगवाडी रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा अ‍ंदोलन...
       धनगांव ग्रामस्थांचा ईशारा....

=====================================


=====================================

भिलवडी (धनगांव) | दि. 08/06/2022

धनगांव बुरुंगवाडी हा पलुस तालुक्यातील अतीशय महत्वाचा रस्ता आहे. तालुक्यांतर्गत वहातुकीसाठि सर्वांना उपयुक्त असणारा हा रस्ता बुरुंवाडी आणि धनगांवच्या दरम्यान अतिशय खराब झाला आहे. याबाबत बर्‍याचवेळा तक्रारी करुन सुद्धा प्रशासनाकडुन कसलिहि दखल घेतली जात नाहि. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी वेळ काढुपणा करत आहेत. रस्त्य‍वर गुडघाभर खड्डे पडले आहेत वहातुकिस अत्यंत धोकादायक बनलेल्या रस्त्याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात चार महिने तसेच पुरपरिस्थितीमध्ये धनग‍ांवकरांना या रस्त्याशिवाय कोणताच पर्यायी मार्ग उपलब्ध नसतो आणि नाहि. या खराब रस्त्याच्या दरम्यान मोठा कॅनॉल आहे त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची किंवा दुर्घटना घडण्य‍ाची  शक्कयता नाकारता येत नाहि. याबाबत वारंवार सुचना देऊनहि प्रशासनामार्फत कोणतिहि उपाययोजना केली जात नाहि. 

य‍बाबत तातडीने कारवाई करुन रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा धनगांव ग्रामस्थांनी दिला आहे. 

याबाबत पलुस पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता वाघमारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिपक भोसले दत्ता उतळे शशिकांत साळुंखे ग्र‍ामपंचायत सदस्य रमेश पाटिल शैलेश साळुंखे अभिजीत साळुंखे आदि उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆