yuva MAharashtra औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात गुरुभक्तांची आलोट गर्दी राज्याच्या अनेक भागातून गुरुभक्तांची उपस्थिती...

औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात गुरुभक्तांची आलोट गर्दी राज्याच्या अनेक भागातून गुरुभक्तांची उपस्थिती...





======================================


======================================

भिलवडी | दि. १३ जुलै २०२२

औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात गुरुभक्तांची आलोट गर्दी राज्याच्या अनेक भागातून गुरुभक्तांची उपस्थिती.

सांगली जिल्ह्या पलूस तालुक्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे.


आज गुरुपौर्णिमा.. आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव राज्यभरात अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याच्या अनेक भागातून गुरुभक्तांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र औदुंबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी श्रीं ची काकड आरती व मंगल आरती तर 12 वाजून 30 मिनिटांनी महापूजा व महाआरती संपन्न झाली.


मंदिरातील पुजारी मंडळीकडून धार्मिक विधी व पुजापाठ करण्यात आले.
यावेळी दत्त सेवाभावी मंडळ (ट्रस्ट) यांचेवतीने महाप्रसाद व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆