जिल्हा उद्योग केंद्राच्या अर्थसहाय्य योजनेला बँकानी सहकार्य करावे...संतोष गवळी ( जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक )
======================================
==============================
तासगाव | दि. 3 जुलै 2022
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेला बँकानी सहकार्य केल्यास नव उद्योजक उभे रहातीलअसे मत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संतोष गवळी यांनी व्यक्त केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला यावेळी जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक संतोष गवळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी तासगाव शाखेचे शाखाधिकारी सारंग खाडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष संदेश भंडारे यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक व विविध शासकीय योजना आणि बँकांचे धोरण यावर चर्चा केली, गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी बँकेने मदत करावी, यासाठी विशेष कार्यक्रम आखावा अशी मागणी केली. याप्रसंगी रिपाई वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्ना कोकणे, गणेश पाटील, विजय कांबळे, अनिल कांबळे, नजीर मुजावर, मुन्ना कोकणे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब वाडकर, प्रवीण मोरे आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆