======================================
======================================
आजी माजी सैनिक संघटना भिलवडी ता.पलूस जि.सांगली रजि. नं. महाराष्ट्र 76/2018 ची वार्षिक सभा संघटनेच्या कार्यालयात दि. १६ जुलै रोजी भिलवडी येथे खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील होते. सभेसाठी संचालक मंडळ व सर्व सभासद उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत सचिव जी के शेख यांनी करुन संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले व संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेच्या कार्याची व संघटनेने वर्ष 2021/ 22 या वर्षात केलेल्या सार्वजनिक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या सभेत सन 2022/23 या वर्षाच्या कार्यकरणीच्या नवीन निवडी करण्यात आल्या. या नवीन कार्यकारिणीमध्ये विद्यमान अध्यक्ष कुमार पाटील यांची पुन्हा एकदा अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. कयुम इकबाल पठाण यांची उपाध्यक्ष , सुनील चौगुले यांची सहकार्यवाह , जी. के. शेख सचिव , उत्तम गोविंद कांबळे भाई खजिनदार , मारुती शामराव यादव कार्यवाहक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेच्या पुढील प्रगतीसाठी आजी माजी सैनिक संघटनेतर्फे नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे माजी सैनिक प्रदीप शंकर पाटील
साहेबजी नायकवडी , गोविंद कोळी , मुकेश बिरबल वावरे आदी संचालक उपस्थित होते.
आजी माजी सैनिक संघटना भिलवडी
कार्यकारणी
1. कुमार बापू पाटील अध्यक्ष
2. कयुम इकबाल पठाण. उपाध्यक्ष
3. मारुती शामराव यादव कार्यवाहक
4. उत्तम गोविंद कांबळे भाई खजिनदार
5. जी के शेख सचिव
6. सुनिल विजयकुमार चौगुले सहकार्यवाह
7. मुकुंद शामराव तावदर
8. मुबारक चांद पठाण
9. सलीम दस्तिगर मुल्ला
10.प्रकाश भीमराव हिंगणे
11.भालचंद्र भूपाल सकले
12.रामचंद्र बाबू माळी
13. अभिजित यादव
14.महादेव बापू पाटील
15. जितेंद्र जालिंदर मराठे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆