भिलवडी : आषाढी एकादशी निमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालचमूंची दिंडी...
============================================================================
भिलवडी | दि. ०८/०७/२०२२
आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने आज शुक्रवार दि. ८ जुलै रोजी विठूनामाच्या गजराने भिलवडी शिक्षण संस्थेची इंग्लिश मिडियम स्कूल हि शाळा दुमदुमली होती. बालवारकऱ्यांनी हातात टाळ, मृदंग घेऊन विठूनामाचा जयघोष केला. तसेच वारी, रिंगण सोहळे, पालखीचे कार्यक्रम, अभंगांचे सादरीकरण शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी उत्साहात केले.
विद्यार्थ्यांनी केलेल्या विठोबा-रखुमाईच्या वेशभूषेने हा सोहळा अधिक रंगला. विद्यार्थ्यांनी स्वत: हाताने तयार केलेल्या पालखीचे देखील विशेष आकर्षण होते. माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला होता.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆