=====================================
=====================================
भिलवडी | दि. १९ ऑगस्ट २०२२
सांगली जिल्ह्यातील वाचन चळवळीत अग्रेसर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या अध्यक्ष पदी उद्योजक गिरीश चितळे व कार्यवाह पदी साहित्यिक सुभाष कवडे यांची सर्वानुमते निवड झाली २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी हि निवड झाली आहे नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व संचालक मंडळाची निवड सर्वानुमते करण्यात आली.निवड करण्यात आलेले कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे
श्री.गिरीश चितळे (अध्यक्ष),श्री चिंतामणी जोग (उपाध्यक्ष ),श्री.सुभाष कवडे (कार्यवाह),श्री.डॉ.भालचंद्र कुलकर्णी (विश्वस्त ),श्री.ग.गो.पाटील (विश्वस्त),श्री.रघुनाथ देसाई (विश्वस्त) कार्यकारी मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे श्री.जयंत केळकर ,श्री.भूपाल मगदूम,श्री.रमेश सखाराम पाटील,श्री.ए.के.चौगुले,श्री जिवंधर चौगुले,श्री.डी.आर.कदम,श्री अशोक साठे,श्री.हनमंत डिसले,श्री.बालासो पांडुरंग पाटील ,श्री.डॉ.जयकुमार चोपडे,श्री महादेव जोशी,श्री.यशवंत जोशी,श्री.प्रदीप शेटे.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी हि संस्था गेली ८२ वर्षे कार्यरत असून वाचनालयाची भव्य प्रशस्त व स्वमालकीची वास्तू आहे.२५ हजार हून अधिक ग्रंथधन असून विद्यार्थी अभ्यासिका वाचनकट्टा व्याख्यानमाला विद्यार्थीग्रामस्थ सत्कार समारंभ ग्रंथ प्रदर्शने इत्यादी उपक्रम सातत्याने राबविले जातात महाराष्ट्र शासनाचा सर्वोकृष्ट ग्रंथालयाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.वाचनालयाच्या चौफेर प्रगतीसाठी कटिबद्ध राहून वाचनालय राज्यात आदर्श ठरवू असे मत अध्यक्ष गिरीश चितळे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆