yuva MAharashtra प्रभारी वैद्यकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल डॉ. सोफिया शेख यांचा सत्कार..

प्रभारी वैद्यकीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल डॉ. सोफिया शेख यांचा सत्कार..




====================================




=====================================

भिलवडी | दि. २३ ऑगस्ट २०२२

भिलवडी तालुका पलूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे डॉ . सोफिया शेख यांची प्रभारी वैद्यकीय अधिकारी पदी नुकतीच निवड झाली. याबद्दल भिलवडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सद्स्या सौ.सविता महिंद पाटील व रुपाली कांबळे ग्रामपंचायत सद्स्या भिलवडी यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आरोग्य सहाय्यक सतिश ननावरे ,
बाळासाहेब भंडारे , आरोग्य सेविका नंदा सादरे , राहूल कांबळे , बाळासाहेब महिंद पाटील , सनी यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. सोफिया शेख यांनी कोरोना काळात भिलवडी व परीसरातील कोविड रुग्णांना अतिशय उत्तम सेवा दिली आहे. त्याचबरोबर सध्या त्यांचे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ते मित्रा प्रमाणे मार्गदर्शन व मदत करतात. त्यांच्या या रुग्ण सेवेची दखल घेऊन व त्यांची प्रभारी वैद्यकीय अधिकारी पदी निवड झाले बदल त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती राहूल कांबळे यांनी दिली.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
 ➡️           www.theJanshaktiNews.in


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆