=====================================
=====================================
भिलवडी | दि. २४ ऑगस्ट २०२२
भिलवडी (ता.पलूस) शिक्षण संस्थेच्या, सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज मधील उपक्रमशील विज्ञान शिक्षक शशिकांत आनंदराव उंडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ दि.१२/०८/२०२२ रोजी संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सह पत्नी त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुरूवातीला स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा.मानसिंग हाके यांनी केले. सहकारी शिक्षक वर्ग व उंडे सर कुटुंबीय यांनी सरांविषयी मनोगत व्यक्त केले.आपले मनोगत व्यक्त करताना, निरपेक्ष वृत्तीने भिलवडी शिक्षण संस्थेची सेवा केली , त्यामुळे आनंदी व समाधानी जीवन प्रवास केला.याबदल त्यांनी कुटुंबीयांना धन्यवाद दिले.कदम कुटुंबीय यांच्या सहकार्याने, भिलवडी शिक्षण संस्थेस मोलाची मदत केली आहे.आज सेवानिवृत्त झालो असलो तरी, भविष्यात हमखास लागेल ती मदत करणेची ग्वाही उंडे सर यांनी दिली.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेस उंडे कुटुंबीयांच्या हस्ते 1,11,111 ( एक लाख आकरा हजार एकशे अकरा ) भरीव अशी मोलाची देणगी दिली.
समारंभाचे प्रमुख पाहुणे आमदार डॉ.विश्र्वजीत कदम यांनी शशिकांत उंडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला. स्व.डॉ.पतंगराव कदम, यांच्या व उंडे सरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.भिलवडी परिसरात शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे.या परिसरातील अनेक विद्यार्थी या संस्थेने घडवले आहेत.कदम कुटुंबीयांची सदैव मदत भिलवडी शिक्षण संस्थेस राहील,अशी ग्वाही दिली.
संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे यावेळी बोलताना म्हणाले की उंडे सर यांच्या कामाच्या अनुभवाचा, आमच्या संस्थेस मोठा उपयोग झाला.या समारंभास मा.आमदार वनश्री मोहनशेठ (दादा) कदम , आनंदराव मोहीते, महेंद्र (आप्पा) लाड , संग्राम पाटील, गिरीश चितळे , अजित शिरगावकर, भिलवडी शिक्षण संस्थेचे आजी माजी संचालक, भिलवडी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेते,उंडे सरांचे नातेवाईक, सेकंडरी व संस्थेच्या विभागांचे सेवक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कुकडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी मानले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●