yuva MAharashtra श्री.ची मूर्ती घरी विसर्जन करा आणि एक पुस्तक भेट मिळवा.. भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्राचा उपक्रम

श्री.ची मूर्ती घरी विसर्जन करा आणि एक पुस्तक भेट मिळवा.. भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्राचा उपक्रम





श्री.ची मूर्ती घरी विसर्जन करा आणि एक पुस्तक भेट मिळवा..

भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्राचा उपक्रम

=====================================



=====================================

भिलवडी | दि. २६ ऑगस्ट २०२२

पलूस तालुक्यातील भिलवडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे या हि वर्षी साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने श्री ची मूर्ती घरीच विसर्जन करा आणि एक सुंदर पुस्तक भेट मिळवा हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्र प्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे. संस्कार केंद्राच्या वतीने भिलवडी आणि परिसरातील सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात आले आहे शाडूची किंवा मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी व घरच्या अंगणात बादलीत किंवा टपात विसर्जन करावे यासाठी सुभाष कवडे (९६६५२२१८२२) श्री.हनमंत डिसले(८६००१२०२४०) व श्री.बाळासाहेब माने सर(७७२०८८२०३०)यांच्याशी संपर्क साधावा व नावे नोद्वावी विसर्जनाचा फोटो वरील नंबर वर पाठवावा.



 
संस्कार केंद्राच्या वतीने विसर्जनाच्या दिवशी कृष्णा घाटावर निर्माल्य संकलन केले जाणार आहे विसर्जन स्थळी असलेल्या ट्राँलीत किंवा बॉक्स मध्ये निमार्ल्य विसर्जन करावे नदीत निर्माल्य विसर्जन करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे संस्कार केंद्राच्या वतीने गेली २०वर्षे पर्यावरण पूरक सन साजरे करण्याबाबत विद्यार्थ्यांवर व पालकांवर संस्कार करण्यात येत आहेत यावर्षीच्या पर्यावरणपूरक सणाच्या वरील उपक्रमात श्री भक्तांनी जास्तीत जास्त संखेने सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षण करावे असे आवाहन संस्कार केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆