डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, महासंचालक धम्मज्योती गजभिये व डॉ. प्रिती
राऊत व इतर मान्यवर
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
======================================
======================================
सांगली | दि 3 ऑगस्ट 2022
अनेक महिन्यापासून राज्यातील रखडलेली विध्यार्थी स्कॉलरशिप तात्काळ वितरित करा,
सांगली जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनांना विशेष निधी देऊन घरकुल, संविधान भवन, युवा बचत गट व बेरोजगार युवकांचे उद्योगाना गतिमान करण्यासाठी मागणी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे केली.
पुणे येथील बार्टीच्या मुख्यालयात भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी नागपूर येथील लक्ष एमपीएससी अकादमीच्या संचालिका डॉ प्रिती राऊत उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ओबीसी, अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील गरीब विध्यार्थी, स्कॉलरशिप योजना याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यासाठी नवे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मंजूर करावे अशी मागणी केली.
रिपाईचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी जातपडताळणी बाबत च्या अडचणी सांगून विविध समस्यांचे पाढे वाचले. तसेच युवा बचत गटांच्या माध्यमातून उद्योग निर्मिती साठी योजना राबवण्याची विनंती केली, बेरोजगार युवकांना सक्षम करण्यासाठी राज्य व केंद्रातील योजना अमलात याव्यात यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली.
यावेळी प्रथमेश कांबळे, सरचिटणीस प्रविण मोरे, सिद्धार्थ कांबळे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब वाडकर उपस्थित होते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●