=====================================
=====================================
भिलवडी | दि. २२ ऑगस्ट २०२२
भिलवडी ( ता. पलूस ) येथील पुनम चेतन आरगे (वय २५ ) रा . वसंतदादा नगर भिलवडी या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही .
घटना ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार पुनम आरगे हिचा गेल्या दोन वर्षा मागे वसंतदादा नगर भिलवडी येथील चेतन कुठनाप्पा आरगे याच्याशी विवाह झाला होता . त्यांना एक वर्षाचा मुलगा श्रेयनय आहे . पहीला मुलगा झाला याचा आनंद आरगे परिवाराला झाला होता .
परंतु पूनम ह्या रक्षाबंधन साठी आपल्या माहेरी शिरदवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर या गावी गेल्या होत्या . त्या २० तारखेला आपल्या सासरी भिलवडीला आल्या होत्या . २१ तारखेला त्यांनी आपल्या राहत्या घरी वरच्या मजल्याच्या खोलीमध्ये फॅनला आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली .
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटना ठिकाणी भिलवडी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला .आत्महत्येच्या कारणा संदर्भात भिलवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत . या घटनेने भिलवडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून . एका वर्षाचा श्रेयनय आईस पोरका झाल्याचे दुःख मात्र अनेक नागरिकांच्यामधून व्यक्त होत आहे .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆