=====================================
=====================================
भिलवडी | दि.१६ ऑगस्ट २०२२
चॅलेंजर्स ग्रुप भिलवडी यांचे आवाहनास प्रतिसाद देत माळवाडी येथील युवा नेते, पुणे येथील बजाज ऑटो लि.मध्ये कार्यरत असणारे युवा उद्योजक... मा. श्री अनिल मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत भिलवडी येथील दिगंबर मोरे यांना वैद्यकीय उपचारासाठी पाच हजार रुपये ( ५०००/- रू. ) आर्थिक मदत केली. स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चास फाटा देत सदर आर्थिक मदत करण्यात आली.. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न झाला...
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 800 शालेय विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले...माळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी,आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी, सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी,सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी,संत ज्ञानेश्वर विद्यालय वसगडे, आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे, इस्लामपूर येथील विजयमाला मुला मुलींचे वस्तीगृह.. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले... श्री अनिल मोरे हे सध्या देहूगाव पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहेत.. परंतु गावाची व परिसराची नाळ जोडली असल्याने सतत विधायक उपक्रमात ते अग्रेसर असतात... सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्यामुळे गावातून व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे...
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●