yuva MAharashtra सरकारने आरे जंगल म्हणून घोषित करावे. धनंजय पाटील... काँग्रेस पक्ष नेहमी पर्यावरणाच्या बाजूने ठाम राहणार...

सरकारने आरे जंगल म्हणून घोषित करावे. धनंजय पाटील... काँग्रेस पक्ष नेहमी पर्यावरणाच्या बाजूने ठाम राहणार...



======================================


======================================

भिलवडी | दि. 23 ऑगस्ट 2022

अरेचे जंगल वाचावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच मुंबई ठाणे येथील मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची मुक्तता केली होती.

आरेचा जंगल हे मुंबईच्या इतिहासामधील ऐतिहासिक ठिकाण आहे, मुंबईचे पर्यावरण शाबुत राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, जशी मुंबई वाढत गेली तसा मुंबईच्या किनाऱ्याचा समुद्रा वर भर टाकून मुंबई मोठी केली, तसेच आता काही विघ्न संतोषी लोकांच्या दृष्टी अरे जंगलातील 3212 एकर जमीनीवर आहे.  त्यांना विकासाच्या नावाखाली ही जमीन गिळंकृत करायची आहे. विकास करायला आमचा विरोध नाही पण पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टा पायी हे असे निर्णय घेतले जात आहेत. आता सध्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे पाठीमागच्या सरकारमध्ये नगर विकास मंत्री असताना त्यांच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये  आरे जंगलातील कारशेडला स्थगिती देऊन, ते कांजूरमार्गला हलविण्यात आले होते परंतू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या झाल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आरे मधील मेट्रो कार शेडची स्थगिती उठून त्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली किती आहेत ? त्यांनी जनमानसाच्या भावना ओळखून आरे जंगल हे जंगल म्हणूनच रहावे असे घोषित करावे अन्यथा त्यांना याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अरेचे जंगल राहावे म्हणून टोकाची भूमिका घेऊन संघर्ष करायची तयारी ठेवली आहे. वेळप्रसंगी आम्ही आरे मध्ये चिपको आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन करत आहोत. आमची सरकारला विनंती राहील की, आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर येऊन आंदोलन केलं उद्या आम्ही त्याच्यापेक्षा काही वेगळी भूमिका घेतली व त्यातून काही अनुचित प्रकार घडले तर त्याला सर्वस्वी विद्यमान सरकार जबाबदार राहील. काँग्रेस पक्ष सदैव पर्यावरणाच्या बाजूने उभा राहिला आहे इथून पुढेही राहील.अशी माहिती अरे जंगल वाचावे यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर भिलवडी ता.पलूस येथे परतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय संपतराव  पाटील यांनी दिली.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●