yuva MAharashtra भिलवडी पोलीस ठाण्याचे साह.पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी हजारवाडी येथील HPCL गॅस मधील वाहन चालकांना वाहतुकीचे नियम याबाबत केले मार्गदर्शन...

भिलवडी पोलीस ठाण्याचे साह.पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी हजारवाडी येथील HPCL गॅस मधील वाहन चालकांना वाहतुकीचे नियम याबाबत केले मार्गदर्शन...



=====================================



=====================================

भिलवडी | दि.१३ ऑगस्ट २०२२

पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 11.8.2022 रोजी  11.30 ते  12.00  या वेळेत HPCL गॅस प्लांट व  HPCL ऑईल डेपो हजारवाडी येथील वाहन चालकांना भिलवडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी
वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. 
यावेळी सदर कार्यक्रमास  40 ते 45 HPCL प्लांट मधील वाहन चालक उपस्थित होते. 



कोणतीही घटना घडल्यास तातडीने '112' क्रमांक डायल करा. अवघ्या दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होतील. गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत करण्यासाठी 'डायल 112' ही नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली आहे. याचे नियंत्रण नवी मुंबई व नागपूरमधून होत आहे. 24 तास ही 'हेल्पलाईन' सेवा सुरू आहे अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

दरम्यान त्यांनी क्षितिज गुरुकुल निवासी शाळा व जुनिअर कॉलेज बुरुंगवाडी ता.पलूस येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली  व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना  सायबर गुन्हे तसेच महिला सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी  शाळेतील 90 ते 100 विद्यार्थी आणि  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी सहा.पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी  सर्वांना " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " मोठ्या प्रमाणात साजरा करणेचे आवाहन केले.





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆







◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆