======================================
======================================
सांगली | दि. १७ सप्टेंबर २०२२
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सांगली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची आई वारस असलेली बागायत शेत जमीन इतर वारसानी तक्रारदार यांचे आईस बिना मोबदला सह दुय्यम निबंधक वाळवा यांचे कार्यालयात कायम व खुष खरेदीपत्राने स्वखुशीने लिहून दिलेली आहे. सदर जमीनीचे खुष खरेदीपत्राचा ऑनलाईन फेरफार तलाठी कापूसखेड यांचे लॉगीनला गेला होता. तक्रारदार यांनी त्यांचे नोंदीचे काम झाले काय याबाबत कापूसखेड गावचे तलाठी सुनिल जावीर यांचेकडे चौकशी केली असता. तलाठी जावीर यांनी तक्रारदार यांचे आईचे नावाने झालेल्या कायम व खुषखरेदी पत्राची सात बारा उताऱ्यावर नोंद घालणे करीता तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी दि. १४.०९.२०२२ रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १५.०९.२०२२ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्री. सुनिल जावीर, तलाठी कापुसखेड यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रूपये लाच मागणी करून तक्रारदार यांचे आईचे नांवच्या कायम खुष खरेदीपत्राची अधिकार अभिलेखात नोंद घालणे करीता १५,०००/ रुपये लाच रक्कम आणुन देण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने श्री. सुनिल बाबुराव जावीर, तलाठी कापुसखेड, ता. वाळवा, रा. मिरजवाडी, ता. वाळवा, जि. सांगली वर्ग ३ यांचे विरुद्ध इस्लामपुर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.