=====================================
=====================================
भिलवडी | दि. ५ ऑक्टोबर २०२२
भिलवडी : रविवार, दिनांक 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून भिलवडी व्यापारी संघटनेने तिसऱ्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा शुभारंभ श्री. राजेंद्र तेली सचिव व्यापारी संघटना भिलवडी व अध्यक्ष ओबीसी संघटना भिलवडी यांचे हस्ते करण्यात आला . यावेळी संघटनेचे सर्वच पदाधिकारी ,सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराला दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापारी, युवा वर्ग त्याचप्रमाणे भिलवडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्साहात रक्तदान केले. नवरात्रीचे उपवास असल्याने इच्छा असूनही बऱ्याच जणांना रक्तदान करता आले नाही. तरीही 102 रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
या शिबिराच्या नियोजनामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील, अध्यक्ष सुबोध वाळवेकर, उपाध्यक्ष रणजीत पाटील, दिपक पाटील , लाला जमादार, राजू कोरे, जावेद तांबोळी, दीपक पाटील, गजाभाऊ चौगुले, पाशुभाई आत्तार, दिलीप पाटील, महेश परीट त्याचप्रमाणे सर्व संचालकांनी मोलाचे योगदान दिले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆