=====================================
=====================================
भिलवडी | दि. २४ ऑक्टोबर २०२२
भिलवडी (ता.पलूस) येथील ग्रामपंचायत आणि भिलवडी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवार दि. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला मान्यवरांचा सत्कार आयोजित केला. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावाला विभागीय स्तरावर पोहोचवणारे ग्रामपंचायतचे माजी सरपंच शहाजी (भाऊ) गुरव यांची सांगली अर्बन बँकेच्या सल्लागारपदी.. महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाबासो (तात्या) मोहिते यांची.. जेष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी बी. डी. पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कृष्णा काठचा तारणहार,भुवनेश्वरीवाडीतील बोट चालक नितीन गुरव यांचा हि सत्कार करण्यात आला.
कु.श्रावणी मोकाशी यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि एका युवकाला जीवदान देणाऱ्या भिलवडी पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. विशाल पांगे या पोलीस मित्राचा सत्कार यावेळी करण्यात आला.
त्याचबरोबर प्रतिवर्षी प्रमाणे गावाच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांचाही दीपावलीच्या निमित्ताने भेटवस्तू-कपडे देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख नेते मंडळी, पत्रकार, कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆