====================================
====================================
पलूस | दि. 28 ऑक्टोबर 2022
पलूस तालुक्यातील बुर्ली येथील नेचर फौंडेशन आयोजित भव्य किल्ले महोत्सव स्पर्धेद्वारे आजच्या लहान पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता यावा याकरिता आपण वरिष्ठ व तरुणांनी आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील थोड्यातरी किल्ल्यांची सफर घडवलीच पाहिजे. याकरिता भव्य किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली होतीे.
तसेच किल्ला स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल लहान मुलांमध्ये आवड व ओढ निर्माण व्हावी, तसेच मोबाइल टीव्ही गेममध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा.
तरुणांमध्ये असलेल्या किल्ले संवर्धनाबद्दलच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न होता.
किल्ला स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक किल्ला बनवणाऱ्यास प्राधान्य होते.बुर्ली, रामानंदनगर आणि शिरगांव या गावामधून आम्हाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
किल्ल्यांचे निरीक्षण करताना आम्ही किल्याची रचना, हुबेहूब मांडणी, साहित्याचा वापर आणि सादरीकरण म्हणजेच किल्ल्याचा इतिहास आणि माहिती या निकषावर गुण दिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,
प्रथम क्रमांक- रॉयल कारभार ग्रुप बुर्ली
द्वितीय क्रमांक- गर्जना ग्रुप शिरगांव
तृतीय क्रमांक- श्री शिवाजी मित्र मंडळ बुर्ली
चतुर्थ क्रमांक- राजमाता ग्रुप बुर्ली
विशेष उत्तेजनार्थ- शिवशक्ती मित्र मंडळ चौगुलेनगर, बुर्ली
उत्तेजनार्थ क्रमांक 1- रणमर्द शिलेदार ग्रुप रामानंदनगर
उत्तेजनार्थ क्रमांक 2- शिवभक्त ग्रुप बुर्ली
उत्तेजनार्थ क्रमांक 3 - शिवतेज ग्रुप बुर्ली
विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकासाठी Adv.सतीश चौगुले (संचालक, क्रांति अग्रणी जी.डी.बापू लाड सह.साखर कारखाना कुंडल) यांच्याकडून रोख रक्कम स्वरूपात 4001/- रु,
द्वितीय क्रमांकासाठी श्री.सचिन सुतार, पोलीस पाटील बुर्ली यांच्याकडून 3001/-रु,
तृतीय क्रमांकासाठी श्री.निलेश कोरे,माजी उपसरपंच बुर्ली यांच्याकडून 2001/-रु,
चतुर्थ क्रमांकासाठी डॉ.दिपक चौगुले बुर्ली यांच्याकडून 1001/-रु,
विशेष उत्तेजनार्थ क्रमांक बक्षीस सिद्धी ग्रुप बुर्ली यांचेकडून 701/-
उत्तेजनार्थ क्रमांक 1,2 आणि 3 साठी श्री.निरज पाटील बुर्ली यांच्या कडून प्रत्येकी 501/- रु देण्यात आले, तसेच डॉ.राजेंद्र शेंडगे यांच्याकडून प्रोत्साहानपर मुलींनी बनवलेल्या किल्यांसाठी 501/- रु देण्यात आले.
ट्रॉफी आणि प्रमाणपत्र सौजन्य श्री.संदीप धाईंजे (विशेष कक्ष अधिकारी,मंत्रालय, मुंबई) यांच्याकडून मिळाले.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना गड किल्ल्यांचीे व सामाजिक उपक्रमाची माहिती असणारे पुस्तक श्री. ए.टी.पाटील सर (राष्ट्रीय हरित सेनेचे सांगली जिल्हा समन्वयक) यांच्या सौजन्याने देण्यात आले.
प्रथम क्रमांक- रॉयल कारभार ग्रुप बुर्ली
द्वितीय क्रमांक- गर्जना ग्रुप शिरगांव
तृतीय क्रमांक- श्री शिवाजी मित्र मंडळ
चतुर्थ क्रमांक- राजमाता ग्रुप बुर्ली
नेचर फौंडेशन कडून
सर्व सहभागी स्पर्धकांना एक झाड भेट देण्यात आले.
यामध्ये वड,पिंपळ, चिंच,गुळभेंडी आणि करंजा अशाप्रकारची खूप सावली देणारी तसेच पक्षांचा या झाडांवर असणारा वावर व त्यांची घरटी यामुळे अशा प्रकारच्या झाडांची निवड केली. पुढील वर्षी या दिलेल्या झाडाचे केलेले संगोपन व घेतलेली काळजी याचे सुद्धा गुण विचारात घेतले जातील. यामुळे नेचर फौंडेशनचा निसर्ग संवर्धनाचा खरा उद्देश साध्य होईल.
बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांची मूर्ती पूजन करून तसेच शिवरायांचा मावळा शाबाज नदाफ याने पोवाडा सादर करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन कैलास पाटील यांनी केले.
नेचर फोंडेशन च्या संपूर्ण कार्याचा आढावा ओंकार खुडे यांनी सादर केला तसेच ए.टी.पाटील सर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले तसेच शेखर पाटील सर यांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांमध्ये Adv.सतीश चौगुले, ए.टी पाटील सर, शेखर पाटील सर, माजी उपसरपंच निलेश कोरे, अनुराग सावंत सर (इंडियन आर्मी), रवी कोरे सर, शितल चौगुले, विकास जाधव, आलम नदाफ हे उपस्थित होते.
किल्ला स्पर्धा घेण्यासाठी नेचर फौंडेशन चे सैफ नदाफ सर, निरज पाटील, कैलास पाटील, संतोष चौगुले,ओंकार खुडे, गणेश जाधव, विशाल कोरे, प्रतीक जाधव, सागर शिंदे, विनायक टोनपे, सचिन पाटील, प्रणव म्हाळकर, संग्राम पाटील, निखिल पाटील, इरफान नदाफ, सनी मिठारी, संग्राम जाधव, शरीफ आकाश पाटील, विकी पाटील, अक्षय आयवळे, संदेश चौगुले, ओंकार गावडे, पवन पाटील, यांनी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆