--------------------------------------------------------------------
=====================================
=====================================
सांगली | दि. ७ ऑक्टोबर २०२२
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने २ मार्च २०२२ व २५ एप्रिल २०२२ रोजी मा. सहायक कामगार आयुक्त सांगली यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्रीसो, मा. कामगारमंत्री, मा. प्रधान सचिवसो, मा. अप्पर कामगार आयुक्तसो यांना निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनात म्हटले होते, बांधकाम कामगारांना औषध उपचार करण्यासाठी मंडळामार्फत जिल्हा ठिकाणी स्वतंत्र्य सर्व सोयीसुविधा युक्त बांधकाम कामगार हॉस्पिटल बांधावे तसेच बांधकाम कामगाराच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलासाठी सर्व सोयीसुविधा युक्त शैक्षणिक वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे अशी मागणी केली होती. या दोन्ही मागण्याचे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला व अखेर ही मागणी
कामगार मंत्री
मान्य केलेली आहे.तसेच मंत्री मंडळात कायदेशीर ठराव करून सदरची मागणी प्रमाणे मंजूर करण्यात येणार आहे. याचा बांधकाम कामगारांना खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆