yuva MAharashtra कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणाची गरज : ॲड.गजानन भाकरे समर्थ संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे सांगोला मध्ये उदघाटन संपन्न..

कौशल्य विकासासाठी प्रशिक्षणाची गरज : ॲड.गजानन भाकरे समर्थ संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राचे सांगोला मध्ये उदघाटन संपन्न..



======================================




=====================================


=====================================

सांगोला | दि. 07 / 10 / 2022

सांगोला : महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सांगोला चे उद्घाटन  भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.गजानन भाकरे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल टकले गुरुजी यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.


 यावेळी प्रमुख पाहुणे श्री भाकरे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचे कौतुक करून अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, मदतनीस कोर्स साठी बाहेरगावी न जाता सांगोल्यातच ही सोय झाल्याने तालुक्यातील महिलांना याचा फायदा होईल व संस्थेचे इतर व्यवसायिक कोर्स करून महिला स्वतःच्या पायावरती उभे राहून सक्षम बनतील असे मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल टकले गुरुजी यांनी या संस्थेने महिला बरोबर युवकांसाठीही प्रशिक्षणाची सोय करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यास मदत करावी असे म्हणून संस्थेला भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. 


संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षिका,सुपरवायझर,परिचारिका,मदतनीस,पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होणार असून याचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक राजू पाटील सर यांनी मांडले या कार्यक्रमास जय मल्हार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंडित पवार,आदर्श शिक्षक उद्धव शिंदे सर,शिवराज पांचाळ सर, संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,संचालक इकबाल पाटील,मेघशाम सुरवसे,शरदचंद्र पवार यांचे सह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●