=====================================
=====================================
भिलवडी | दि. २ नोव्हेंबर २०२२
अंकलखोप (ता.पलूस) येथे जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या बाजूकडूनही धक्काबुक्की व महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबाबत तिघां विरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे. त्यामुळे भिलवडी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने परस्पर विरोधी पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,पलूस तालुक्यातील
अंकलखोप येथे २९ ऑक्टोंबर २०२२ रोजी दहा वाजण्याच्या सुमारास अंकलखोप येथील स्वप्नील सदाशिव जाधव यांच्या घरासमोर स्वप्नील जाधव यांची बहीण सीमा जाधव व शंकर जगदाळे यांचे मध्ये गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबधावरुन भांडण होत असताना ते मिटविण्यासाठी अभिजीत रंगराव लोंढे (वय वर्ष २९) रा.नागठाणे फाटा , बालाजीनगर अंकलखोप ता.पलूस व त्याचा मित्र, स्वप्नील जाधव यांच्या घरासमोर गेले असता अभिजीत लोंढे यास शंकर दीपक जगदाळे व सोन्या उर्फ महेश दीपक जगदाळे यांनी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून, तुला जिवंत सोडणार नाही म्हणून दमदाटी केली अशी फिर्याद अभिजित रंगराव लोंढे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.त्याच्या फिर्यादीवरून शंकर दीपक जगदाळे व सोन्या उर्फ महेश दीपक जगदाळे दोघे रा.विठ्ठलनगर अंकलखोप ता.पलूस यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ३ (१) (आर) (एस)
भा.द.वि.स.क.३५२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा अधिक तपास तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे करीत आहेत.
तसेच अभिजित रंगराव लोंढे,स्वप्निल सदाशिव जाधव, शिवाजी केंगार सर्व रा. अंकलखोप (विठ्ठल नगर) हे महेश दीपक जगदाळे यांना मारहाण करीत असताना, संगिता महेश जगदाळे (वय वर्षे २२) या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, अभिजित रंगराव लोंढे याने संगिता जगदाळे यांना धक्काबुक्की केली व त्यांच्याशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.अशी फिर्याद संगिता महेश जगदाळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. संगिता महेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित रंगराव लोंढे,स्वप्निल सदाशिव जाधव, शिवाजी केंगार यांचे विरूद्ध कलम ३५४(अ), ४५२,३२३, ५०४,३४ प्रमाणे भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा अधिक तपास सा. पो. फौ. प्रकाश पाटील हे करीत आहेत.अभिजित रंगराव लोंढे व संगिता जगदाळे यांनी परस्पर विरोधी फिर्याद भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून, अधिक तपास तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्यासह भिलवडी पोलीस करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆