=====================================
सांगोला | दि. १५ नोव्हेंबर २०२२
मौजे वाटंबरे (ता.सांगोला) येथे मा. कृषि संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन) कृषि आयुक्तालय पुणे श्री सुभाष नागरे सर यांनी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत सुरु असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत प्रस्तावित असलेल्या प्रमिला साळुंखे यांच्या महादीप महिला उद्योग समूहामार्फत इन्स्टंट ढोकळा मिक्स या उत्पादन युनिटला व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुरू असलेल्या श्री दत्तात्रय माळी यांच्या दुध प्रक्रिया उद्योग (खवा,पेढा,कुंदा) युनिटची पाहणी प्रकल्प उभारणी , त्याचे पॕकेजिंग , ब्रॕन्डिंग , विक्री व्यवस्था यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.पी.एम.एफ.एम.इ.अंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारून सुक्ष्म प्रक्रियेचे बास्केट तयार करण्याचे आवाहन मा.कृषि संचालक यांनी केले.
नूतन उद्योजिका प्रमिला साळुंखे यांनी आपला इन्स्टंट ढोकळा मिक्स या उद्योगाच्या उभारणीचा प्रेरणेपासून ते आत्तापर्यंत चा इतिहास थोडक्यात सांगीतला यापुढे पी. एम.एफ.एम.इ.च्या माध्यमातून व्यवसाय वाढवून नवीन उत्पादनाची वाढ करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी सांगोला तालुका कृषी अधिकारी मा. शिवाजी शिंदे साहेब
मंडळ कृषी अधिकारी मा. प्रवीण झांबरे साहेब, मा.रमेश भंडारे साहेब,
कृषी पर्यवेक्षक मा.गोरख खंडागळे साहेब ,
कृषि सहाय्यक.मा. बाळासाहेब सावंत साहेब, मा.संतोष खांडेकर साहेब,
सांगोला तालुका पी. एम.एफ. एम.इ.चे जिल्हा संशोधक व्यक्ती मा. दिपक नरळे साहेब यांचेसह संजय पवार,श्रीधर पवार,शंकर विष्णू पवार,सुभाष पाटोळे,पंडित पवार,दिगंबर साळुंखे आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■