yuva MAharashtra गावागावात संविधान सभागृह बांधा..अविराज काळेबाग यांची मागणी..

गावागावात संविधान सभागृह बांधा..अविराज काळेबाग यांची मागणी..





-------------------------------------------------------------

युट्यूबवर बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा...
      👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
-------------------------------------------------------------



=====================================
=====================================

पलूस | दि. १७ नोव्हेंबर २०२२

 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून  गाव तिथे संविधान सभागृह अशी सरकारने योजना सुरू केली आहे. 

या योजनेनुसार ५०० हुन अधिक लोकसंख्या असलेल्या गावात संविधान सभागृह बांधण्यात येणार आहेत. 

या संविधान सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते ग्रंथालयापर्यंत सर्व गोष्टी असणार आहेत.

 या वर्षापासून संपूर्ण राज्यात संविधान सभागृहाच्या बांधकामाला सुरूवात होणार असल्याचे  राज्याचे सामाजिकन्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी  धम्मचक्र प्रवर्तन दिना दिवशी  सांगितले होते.



परंतु हि योजना  पलूस तालुक्यात अद्यापही सुरु न झाल्यामुळे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष  अविराज काळेबाग यांनी पलुसचे तहसीलदार  निवास ढाणे व गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील यांना  गाव तिथे संविधान सभागृह बांधा असे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभेत ठराव मंजूर करून घ्या अशा सूचना देण्यात यावे यासंदर्भात  निवेदन देण्यात आले. 




यावेळी अध्यक्ष पलुस- कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■





■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■