yuva MAharashtra भिलवडीत सानेगुरुजी केंद्राचे वतीने फुलपाखरू कवितेच्या शताब्दी निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन

भिलवडीत सानेगुरुजी केंद्राचे वतीने फुलपाखरू कवितेच्या शताब्दी निमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन



====================================
====================================

भिलवडी | दि. २० नोव्हेंबर २०२२

भिलवडी : कवी कै.ग.ह.पाटील यांनी लिहलेली फुलपाखरू कविता शतायुषी झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये या कवितेस १०० वर्षे पूर्ण झाली. या कवितेच्या शताब्दी वर्षानिमित्त पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती केंद्र पमुख सुभाष कवडे सर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे श्री.कवडे यांनी सांगितली की,

●१०० वर्षापूर्वी लिहलेली फुलपाखरू हि कविता वाचून विद्यार्थ्यांनी कवितेवर आधारित सुंंदर चित्र काढावयाचे आहे

● ते आकर्षक रंगात रंगवायचे आहे.

● कवितेचा आशय त्या चित्रात आला पाहिजे. 

● हा उपक्रम इयता ४ थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 

● चित्रासाठी कागद केंद्राच्या वतीने देण्यात येणार आहे.

● विद्यार्थ्यांनी कागदाच्या एका कोपऱ्यात आपले नाव इयत्ता शाळेचे नाव लिहावयाचे आहे. 

●फुलपाखरू हि कविता सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला कागदाबरोबरच देण्यात येणार आहे.

●१० डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी आपली चित्रे केंद्रात जमा करावयाची आहे.

● पहिल्या पाच क्रमांकांना प्रमाणपत्र व सुंदर पुस्तक भेट देण्यात येईल●
कवितेची गोडी निर्माण करणे,निसर्ग प्रेम वाढविणे,कल्पना शक्तीला चालना देणे व निसर्गातील प्राणीपक्ष्याविषयी प्रेम निर्माण करणे,१०० वर्षापूर्वी लिहलेली कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले आहे या बरोबरीने कवी ग.ह.पाटील यांच्या उपलब्ध असणाऱ्या सर्व बालकवितांचे झेरॉक्स काढून सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

 एका कवितेचा शताब्दी मोहोत्सव या पद्धतीने साजरा केला जात असल्याची माहितीही श्री कवडे यांनी दिली.
 या उपक्रमात इयत्ता ४थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆