=====================================
=====================================
भिलवडी | दि. ०५ नोव्हेंबर २०२२
राज्यामध्ये डोक्याचे आणि खोक्याचे राजकारण सुरू असून सरकारला सर्वसामान्यांच्या बाबत गांभीर्य नाही असे मत भिलवडी येथील पलूस तालुका दलित महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन मोरे यांची निवड झाल्याबद्दल दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांनी व्यक्त केले .
यावेळी भिवडीचे प्रमुख नेते सांगली कारखाना संचालक राजू दादा पाटील . सरपंच सौ विद्याताई सचिन पाटील . उपसरपंच पृथ्वीराज पाटील . मोहन नाना तावदर . सचिन पाटील .सांगली अर्बन बँकेचे भिलवडी शाखेचे सल्लागार शहाजी गुरव .तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विलास अण्णा पाटील . दक्षिणभाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासो काका मोहिते . माजी उपसरपंच बाळासो मोरे . दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष महापुरे माजी सरपंच विजय चोपडे .साठेनगर मधील सर्व युवक मंडळी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
यावेळी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर पुढे म्हणाले दलित महासंघाने नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला आहे .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 गावांचा दौरा करण्यात आला यामध्ये भिलवडी गाव हे एक चांगल्या सामाजिक बांधिलकीने आणि एक दिलाने राहणार गांव म्हणून मला त्याचा अभिमान वाटला .स्वर्गीय बाळासाहेब काकांचा गाव आज तागायत सर्वसामान्यांना हातात हात घालून न्याय मिळवून देणारा गाव म्हणूनच या गावातील नितीन मोरे सरख्या तडफदार कामाचा माणूस म्हणून मी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनांने पाहिलं आणि तेव्हाच ठरवलं की पलूस तालुक्यामध्ये आपल्या महासंघाचा त्याला अध्यक्ष करायचा . आणि त्याचा योग आता जुळून आला गावातील सर्व पक्षातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत . आणि नितीन च्या पाठीमागे चांगल्या पद्धतीने त्याला साथ देतील आणि खंबीरपणा त्याच्या पाठीमागे उभे राहतील असे चित्र दिसून आले असंच काम नितीनने पुढील काळात जोमाने करावं आणि या पलूस तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याचे नावलौकिक करावं सर्वसामान्यना न्याय मिळवून द्यावा .सर्वसामान्यांसाठी सदैव झटले पाहिजे सर्व सामान्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या निकाली लागल्या पाहिजेत . आणि हे काम प्रामाणिकपणानं नितीन मोरे करतील असं मला वाटतं आणि त्यांच्या पाठीमागे सदैव आम्ही राहीन चांगल्या कामाला त्यांच्या माझ्या शंभर टक्के शुभेच्छा आहेत . यावेळी नितीन मोरे यांना पलूस तालुक्याचे अध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले . व त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी माजी उपसरपंच बाळासो अण्णा मोरे यांनी सर्वसामान्यांच्या कामाबाबत नितीनने गांभिर्यान घ्यावं असं मत व्यक्त केलं
नितीन मोरे यांनी सत्काराला उत्तर देत दलित महासंघाच्या पदावरून प्रामाणिक पणे काम करीन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करीन असं मत व्यक्त केले .रोहित नाना मोरे .विशाल मोरे . घनश्याम मोरे . यांची भाषणे झाली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार विलास मोरे आणि मानले .
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆