=====================================
=====================================
भिलवडी | दि. २४ नोव्हेंबर२०२२
भिलवडी (ता.पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवा निमित्त उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी, राष्ट्रीय हाँलीबाँल खेळाडू अश्विनी पाटील उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना व स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना अश्विनी पाटील म्हणाल्या की, खेळामुळे शरीर व मन सदृढ होते. खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळात सहभाग घ्यावा. खेळामुळे शरीर, मन व बुद्धी यांचा विकास होतो. जीवनात यशस्वी होता येते. वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. खेळामुळे स्वतःचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढविता येतो. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. कु. साक्षी कुर्लेकर हिने सर्व विद्यार्थ्यांना खेळाची शपथ दिली. मुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग हाके, उपमुख्याध्यापक संभाजी माने, पर्यवेक्षिका राजकुमारी यादव, जेष्ठ शिक्षक एस. एस मोरे, जी. एस साळुंखे, पी. पी. पाटील, विजय तेली, विनोद सावंत, प्रल्हाद पाटील,रूपेश कर्पे, सुरज पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख रघुनाथ हिरूगडे, पाहुणे परिचय के. आर पाटील, यांनी व आभार निलेश कुडाळकर यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆