=====================================
कुंडल | दि. ०७ नोव्हेंबर २०२२
कुंडल (ता.पलूस) : क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाण्याच्या भागविकास निधीतून मुस्लिम दफन भूमीच्या संरक्षण भिंतीचा लोकार्पण सोहळा आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते पार पडला.यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार प्रमुख उपस्थित होते.
येथील नदाफ, खाटीक, तांबोळी समाजाची दफनभूमी रस्त्यालगतच असल्याने त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी पूर्ण समाजाने आमदार लाड यांच्याकडे संरक्षक भिंतीची मागणी केली होती त्यानुसार क्रांती कारखान्याच्या भाग विकास निधीतून 8 लाख 50 हजारांचा निधी खर्च करून संरक्षक भिंत बांधून देणेत आली.
----------------------------------------------------------------------
मुस्लिम समाजाच्या दफन भूमीच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण करताना आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड, शरद लाड आदि.
मुस्लिम समाजाच्या दफन भूमीच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण करताना आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड, शरद लाड आदि.
----------------------------------------------------------------------
ही भिंत म्हणजे समाजातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने भावनिक वातावरणात लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी आमदार लाड यांचे आभार मानले व दफणभूमीत सौरऊर्जेवरील विद्युत संच, बसण्यासाठी बाकडे व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष फिरोज नदाफ, उपाध्यक्ष फैय्याज मुल्ला, खजिनदार एच आय मुल्ला, बालेखान मुल्ला, महंमद खाटीक, रसूल नदाफ, गणी नदाफ, इकबाल नदाफ, गुलाब मुलानी, शौकत मुल्ला, बशीर नदाफ, मुजीब मुल्ला, मौला नदाफ, जुबेर मुल्ला, इमाम मुल्ला, अरुण चोथे, पी एस चव्हाण, पूजा लाड, प्रथमेश दिवटे यांचेसह मुस्लिम समाजातील बांधव, नागरिक, पदाधिकारी, कारखाना संचालक उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆