======================================
कुंडल | दि. 28 नोव्हेंबर 2022
कुंडल (ता.पलूस) पंचशील नगर या ठिकाणी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका युवक आघाडी, अध्यक्ष मा. अविनाश काळीबाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाख्यात संविधान दिन साजरा करण्यात आला...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष १८ महिने ११ दिवस इतक्या कालावधीत स्वतःला झोकून देऊन जगाला आदर्श देईल असं संविधान आपल्या भारतासाठी तयार केलं , आणि आज जे काही भारत देशात बदल होतोय , वाटतोय तो संविधानामुळे आहे.
संविधान दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आर्मी भरती, एमपीएससी, यूपीएससी, राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व देशसेवेसाठी आप आपल्या पदावरती नियुक्त झालेल्या कर्तबगार विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक , सुप्रसिद्ध युवा व्याख्याते मा. अभिजीत कोळी यांने केले आणि प्रास्ताविकपर भाषणात पुढे बोलताना सांगितले की, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. या महाराष्ट्रात आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपासला तरचं आपली समाज व्यवस्थिता चांगली राहिल.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी पाटील रेणूसे ( CEO बुलढाणा ) , वरिष्ठ बांधकाम अधिकारी प्रतीक निकम , महाराष्ट्र राज्यात एसटीआय मध्ये तिसरा क्रमांक पटकावलेल्या कविता लाड , सुप्रसिद्ध पत्रकार मा. चेतन सावंत उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कुंडल गावाला कुस्तीची परंपरा आहे. त्यामुळे गावातील नामवंत पैलवान यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
पै. ओंकार मदने,पै.अतुल गुजले, पै.सनी मदने.पै.आकाश गुजले, पै.रणजित पाटोळे,पै.गौरव हजारे,पै. अभिषेक घारगे.पै.विक्रम वेताळ यांचा सत्कार पै. अजित भाऊ गुजले , व पै, विशाल नाना गुजले यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख वक्ते पंडित साहेब ,यांनी तरुण वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले ,
निलेश सावंत (बटु) , सनी भाऊ सावंत .विरेश होवाळ. कमलेश सावंत यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजीराव वागले यांनी केले , आभार रोहित सोळवंडे यांनी मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆