yuva MAharashtra भीम सैनिक मनोज गरबडे व पत्रकार गोविंद वाकडे यांची 23 डिसेंबर रोजी सांगली येथे डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हातीवरून मिरवणूक काढणार

भीम सैनिक मनोज गरबडे व पत्रकार गोविंद वाकडे यांची 23 डिसेंबर रोजी सांगली येथे डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हातीवरून मिरवणूक काढणार



⏩                        व्हिडीओ
                             👇👇
           प्रा.सुकुमार कांबळे यांची प्रतिक्रिया
                              पहा..



=====================================
===================================== 

सांगली | दि. 16 डिसेंबर 2022

शाई फेक प्रकरणी पत्रकारला अट्टक करावयास लावून चेंद्रकांत पाटील यांनी लोकशाहीलाच आव्हान दिले आहे अशा या लोकशाहीविरोधी चंद्रकांत पाटलाचा डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो.
ज्या महापुरुषांनी शिक्षणाची दारे खुली करून बहुजन सामाज्याला दृष्टी दिली त्या महापुरुषांच्या बद्दल अवमान कारक भाषा वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या चेद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्रभर निषेध होत असताना पिंपरी चिंचवड येथील एका भीम सैनिकांने चंद्रकांत पटलांच्या तोंडावर शाई टाकून त्यांचा निषेध केला त्या भीम सैनिकाचे करावे तेवढं कौतुक थोडे आहे अशा या भीम सैनिकाला डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जय भीम करतो व त्याचे अभिनंदन करतो.
   भीम सैनिकांने चेद्रकांत पाटलाच्या तोंडावर शाई टाकत असताना ज्या गोविंद वाकडे या पत्रकाराणे तो प्रसंग टिपून प्रसिद्ध केला म्हणून त्याला चेद्रकांत पाटलाच्या सांगण्यावरून संभंधित पोलिसांनी अट्टक करणे हे लोकशाही विरोधी कृत्य असून लोकशाहीचा चौथ्या खांबाला आव्हान देण्यासारखे आहे. अशा या लोकशाही विरोधी चेद्रकांत पाटील यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्या बीजेपीचा निषेध करण्यासाठी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवार दि.23 डिसेंबर रोजी निषेध सभा घेण्यात येणार आहे.
    23 डिसेंबर रोजी सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून चेद्रकांत पाटील यांचा शाई फेकून  निषेध करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजगज व तो क्षेण टिपून लोकशाही जिवंत ठेवणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे या विजयी मिरवणुकीचा शेवट सत्त्यशोधत अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याशेजारी निषेध सभा घेऊन करण्यात येणार आहे.

    या मिरवणूकीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा -- मारुती रोड -- राजवाडा चौक - काँग्रेस भवन ते अण्णाभाऊ साठे पुतळा असा असेल.
  या कार्यक्रमाच्या तयारीच्या संदर्भात एक तातडीची बैठक प्रा. सुकुमार कांबळे याच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते निषेध सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या बैठकीमध्ये महापुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या  चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई टाकून त्यांचा निषेध करणारे भीम सैनिक मनोज गरबडे व पत्रकार गोविंद वाकडे याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

या बैठकीसाठी डीपीआयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नागरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, राज्य सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे, जमीन झोपडी हक्क परिषदेचे अध्यक्ष अशोक वायदंडे, राज्य संघटक दिलीप कुरणे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत आवळे, कबीर चव्हाण,अर्जुन मजले, गायब्रियल तिवाडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शेखर मोहिते, युवक जिल्हा अध्यक्ष वीरू फाळके,जिल्हा उपाध्यक्ष अमित कांबळे, भास्कर सदाकळे, सुनील होळकर, किक्रम मोहिते, बाळासाहेब काटे, शेम्भू बल्लाळ, मानसिंग बल्लाळ, संभाजी भोसले, अविनाश वाघमारे, विशाल कोलार, रवी लांडगे, अनिल सुवासे, शेंकर आवळे, शेवंता वाघमारे विवेक खिलारे, विशाल नागरे, संदीप तडाखे, लालासाहेब तांबिट, रवींद्र आवळे, संतोष सदामते, विपुल सुवासे, समर सरवदे, आबा सुवासे, गोरकनाथ सदाकळे, सागर भोरे, दीपक कांबळे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆