=====================================
कुंडल | दि. ०२ डिसेंबर २०२२
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाचा पहिला हफ्ता रु.3000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेत आल्याची माहिती आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान 1 लाख 16 हजार 290 मे.टन ऊस गाळपासाठी आला होता त्याचे 34 कोटी 88 लाख 71 हजार 686 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. यापुढे गाळपला येणाऱ्या ऊसाच्या साखर उताऱ्या नुसार उपलब्ध होणाऱ्या रकमेतून या प्रमाणे हफ्ता शेतकऱ्यांना देणेत येईल.
कारखाना क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या विचाराने चालवत आहोत, शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्याला वेळेत आणि त्याला आवश्यकता असेल तसे आम्ही देऊ. आजवर क्रांती उद्योग समूहाने नेहमी शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत, तसेच बँकांची सर्व देणी वेळेत दिल्यानेच कारखान्याने अल्पावधीतच लोकमत मिळवले आहे.
यंदा कारखाण्याकडे 14 हजार हेक्टर ऊस नोंद आहे, यावरून 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदीतील जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सर्व संचालक, कार्यकारी संचालक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆