yuva MAharashtra तुरची विकास सहकारी सोसायटीची चौकशी करावी ... संचालक व सभासद यांची मागणी ... ई.आर. वन ऑफीस तासगाव... व डी.डी.आर ऑफीस सांगली यांना दिले निवेदन..

तुरची विकास सहकारी सोसायटीची चौकशी करावी ... संचालक व सभासद यांची मागणी ... ई.आर. वन ऑफीस तासगाव... व डी.डी.आर ऑफीस सांगली यांना दिले निवेदन..




  ⏩                    व्हिडीओ
                             👇👇
        संचालक व सभासद यांची प्रतिक्रिया



=====================================
=====================================
 
तासगाव , तुरची : दि. १५ डिसेंबर २०२२

 तुरची विकास सोसायटीतील चेअरमन व सचिव यांनी संचालक व सभासदांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करून सोसायटीचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करत संचालक व सभासद यांनी  ई.आर. वन ऑफीस तासगाव व डी.डी.आर ऑफीस सांगली यांच्याकडे  निवेदनाद्वारे  चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
संचालक व सभासद यांनी दिलेल्या माहितीनुसार...
तुरची विकास सोसायटीला मुळातच जागा खूप कमी आहे त्यात हे अतिक्रमण केले आहे पाठीमागील पाच वर्षांमध्ये लाखो रुपये खर्चून सोसायटीला वॉल कंपाऊंड तारेचे कंपाऊंड व झाडाची सुशोभीकरण केले होते परंतु अतिशय सुंदर असणाऱ्या झाडांची कत्तल करून पर्यावरणालाही धक्का देऊन कंपाउंड जेसीबीच्या साह्याने पाडून एका दिवसात गाळे उभे केले... सहकार कायदयानुसार इ.आर. वन ऑफीस अथवा डी.डी.आर ऑफीस सांगली यांची रितसर परवानगी घेऊन प्लॅन तयार करून येणारा खर्च या सर्व बाबीची रीतसर परवानगी व मंजूरी घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेऊन सभासदांच्या मान्येतेने मंजूरी घेऊन तसेच याची निविदा काढून वर्तमानपत्रात या विषयी माहिती प्रसिद्ध करुन गावातील सभासदांच्या हा विषय निदर्शनास आणून सर्व रितसर चर्चा करून यासाठी गाळे कोणाला पाहिजे असेल त्यांचे अर्ज घेऊन लिलाव पद्धतीने याची मंजूरी घेणे गरजेचे होते... या गाळ्या संदर्भात सचिव यांना दोन संचालक यांनी हे गाळे मंजूर करण्याची प्रक्रिया कशी केली हे लेखी स्वरुपात निवेदन देऊन माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ करुन तुम्हाला माझ्या विषयी तक्रार कोठे दयायची आहे तेथे दया असे तोंडी सांगण्यात आले आहे... चेअरमन या विषयावर कोणालाही बोलू देत नाहीत...तुरची विकास सोसायटीच्या मासिक मीटिंगमध्ये संचालकांना बोलू दिले जात नाही स्वतः मीटिंगमध्ये ऐकटेच बोलून  राहतात सत्तेत असणाऱ्या आपल्या संचालकांना बोलू दिलं जात नाही  संस्थेमध्ये एकाधिकारशाही करून गोंधळ घातला आहे सदर संस्था ही एक हजार सभासदांची आहे हे विद्यमान चेअरमन विसरून आमच्या घरची संस्था आहे... म्हणून स्वतः अनेक निर्णय हे सहकारच्या कायदाच्या उलट जाऊन संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान करत आहेत त्या ठिकाणी अनेक गैरप्रकार होत आहेत.. अनेक गैरप्रकार संस्थेमध्ये चालू आहेत या सर्व प्रकाराची चौकशी होऊन सभासदांना न्याय मिळावा ही भावना सभासदांच्या मधून व्यक्त होत आहे...


  वरील संदर्भात ई.आर. वन ऑफीस तासगाव... व डी.डी.आर ऑफीस सांगली यांना निवेदन देऊन रितसर चौकशीची मागणी करुन पाडलेले दगडी वॉल कंपाऊड भिंत व झाडे यांचे रितसर नुकसान भरपाई करून घेऊन गाळ्यांचे कामकाज थांबवून संमधीताची  चौकशी करुन योग्य ती कार्यवाही व्हावी ही मागणी करण्यात आली आहे.....


यावेळी निवेदन देताना.. सोसायटीचे संचालक मा. उद्धव तुळशीराम पाटील, श्रीमती सिंधूताई लालासो कटारे, सभासद दिपक पाटील, कुंडलीक पाटील, गोविंद कदम, प्रकाश गलांडे, विलास पाटील, आदी मोठया संख्येने उपस्थित होते..

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

https://www.youtube.com/@thejanshakatinews5707/videos
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆