====================================
====================================
कुंडल | दि.30 डिसेंबर 2022
आरटीई मधून शाळांना थकीत रक्कम द्या आणि याशिवाय अनेक मागण्यांसाठी पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड यांनी आवाज उठवला, या प्रश्नांबाबत अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आदेश काढण्यात येतील असे सांगितले होते पण अधिवेशन संपत आलेतरीही ते आदेश काढले नाहीत म्हणून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार लाड यांच्यासोबत आमदार जयंत आसगावकर, विक्रम काळे, सुधीर तांबे, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, राजेश राठोड यांनी सहभाग घेतला.
आमदार लाड यांनी, तारांकित प्रश्नांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते त्यामध्ये तृटीपात्र शाळांना अनुदान द्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शाळांना प्रचलित धोरणानुसार अनुदान द्या, प्राध्यापकांची व शिक्षकांची रिक्त पदे भरा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या वाढीव पदांना मान्यता द्या, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक पदे त्वरित भरा, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढा, केंद्रीय आश्रम शाळांना वेतन अनुदान देऊन शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीत मान्यता द्या, इंग्रजी शाळांतील शिक्षणाचा अधिकार (आरटीई) ची थकीत रक्कम त्वरित देणे या मागण्यांसाठीचे अध्यादेश निघणार होते पण त्याकडे शासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे, पण जर याबाबत लवकरात लवकर आदेश पारित केले नाहीत तर रस्त्यावर उतरू असा इशारा ही आंदोलन कर्त्यां आमदारांकडून देणेत आला.
पदवीधर आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी आम्ही आग्रही आहोत, आमच्या मागण्यांबाबत अधिवेशनाच्या सुरुवातीला आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप न काढल्याने आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे.... आमदार अरुणअण्णा लाड.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाबाहेर आंदोलन करताना आमदार अरुणअण्णा लाड, आमदार विक्रम काळे, जयंत असगावकर, सुधीर तांबे, किरण सरनाईक ,सतीश चव्हाण ,राजेश राठोड
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆