yuva MAharashtra वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्ष प्रवेश...

वंचित बहुजन आघाडीत अनेकांचा पक्ष प्रवेश...



=====================================
=====================================

सांगली | दि. ५ डिसेंबर २०२२

देशाच्या राजकारणाची व एकदरीत समाजव्यवस्थेची, अर्थव्यवस्थेची होणारी वाईट अवस्था बघता या सगळ्यातून ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हेच मार्ग काढू शकतात त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करीत आहोत. येणाऱ्या काळात पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवू असे प्रतिपादन रियाज पिरखान यांनी केले. यावेळी इब्राहिम शेख, संतोष कांबळे, रलस मलादी, महेश नदोने, सुनील चौगुले, बाळासो झाडगे, विजय कांबळे, विलास सगरे, राहुल सोनवणे, जावेद मुल्ला, संजय जमदाडे, अनिल वडगावे, किरण जमदाडे, नसिर सय्यद आदींनी पक्ष प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, राजू मुलाणी, मनोहर कांबळे, सतिश शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆