=====================================
=====================================
भिलवडी | दि. ०५ नोव्हेंबर २०२२
भिलवडी ( ता. पलूस ) येथील दक्षिण भाग विविध विकास सोसायटीच्या माळवाडी येथील नियोजीत जागेचा भूमीपूजनाचा समारंभ सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासो देवेंद्र चौगुले यांच्या हास्ते संपन्न झाला यावेळी व्हाचेअरमन किशोर महिंद- पाटील . माजी चेअरमन श्रीधर वाळवेकर ( गुरुजी ) सचिव प्रकाश पाटील आदी उपस्थीत होते .
विजय चौगुले उभयंताच्या हास्ते पूजन करण्यात आले .
माळवाडी येथील निशिंदी कॉर्नर लगत पाच गुंठे जागेत स्थंस्थेची भव्य आशी इमारत उभी राहणार आहे . शिवाय मोठे गोडाऊन यामध्ये खताचा मोठा साठा होईल आशी उपलब्धता आसणार आहे . इमारत दोन मजली आसणार आहे . यामध्ये खत विक्रीचे दुकान ही आसणार आहे . जने करुन माळवाडी . खंडोबाचीवाडी या परिसरातील शेतकरयांना शेती संबंधी खते कशी दिली जातील व शेतकरयांना चांगली सेवा कशी दिली जाईल असा मानस सोसायटीचा राहणार आहे . विशेष म्हणजे महापूर काळात भिलवडीतील गोडाऊन मधील खते सुरक्षीत ठेवण्यात माळवाडी येथील गोडाऊनचा मोठा उपयोग होणार आहे . या दृष्ठीने सोसायटीने माळवाडीत पाच गुंठे जागा घेऊन या इमारतीची निर्मीती केली आहे . असे मत सोसायटीचे चेअरमन बाळासो चौगुले यांनी व्यक्त केले आहे . यावेळी सोसायटीचे संचालक महावीर किणीकर . उल्लास ऐतवडे .जनार्धन साळुंखे .पाशा अत्तार . संजय पाटील . भू . ना . मगदूम . माजी सरपंच शहाजी गुरव . विजय चोपडे . चंद्रकांत पाटील . बाळासोकाका मोहिते .विलास पाटील ..तंटामुक्ती अध्यक्ष बाबसो मोहिते . क्रांती तंज्ञ संचालक महावीर चौगुले . सुनील परीट . प्रकाश चौगुले
इंजीनिअर तायवडे पाटील . खत विभाग प्रमुख विकास चौगुले . रविंद्र यादव . संदिप माने . इतर सभासद व सेवक वर्ग उपस्थीत होते .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
भिलवडी येथील दक्षिण भाग सो . माळवाडी जागेत नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ प्रसंगी बाळासो चौगुले . किशोर महिंद पाटील . श्रीधर वाळवेकर . प्रकाश पाटील आदी .