yuva MAharashtra प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य.. जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य.. जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी



======================================
======================================

मिरज | दि. ०२ डिसेंबर २०२२

आरपीआय आठवले गटाचे नेते व पनवेल येथील उपमहापैर गावगुंड जगदीश गायकवाड याने त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी घाणेरड्या खालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या मनावर प्रचंड द्वेष निर्माण झाला आहे. असे वक्तव्य करुन देशांत दंगे घडवण्याचा व देशात सर्वत्र अशांतता पसरवण्याचा डाव असून त्याला त्वरीत अटक करून, आंबेडकर घराण्याविषयी निदंनीय शब्दात शिवीगाळ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारावार चिखल फेक केल्यामुळे त्याच्यावर कठोर गुन्हे दाखल करून त्याला त्वरीत अटक करावी.


कडक कारवाई करावी, कारवाई न झालेस तमाम बहुजानची अस्मिता असलेल्या आंबेडकर घराण्याविषयी असे घाणेरडे शब्दप्रयोग केल्या प्रकरणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दंड विधान संहिता 1860 च्या कलम 500,501,505(2)b, 153A, 504 व 506(part 2) कलमा खाली FIR तात्काळ नोंद करण्यात यावी अन्यथा होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील कृपया याची नोंद घ्यावी.असे लेखी तक्रार अर्ज, मा. पोलीस निरीक्षक सो, मिरज शहर पोलीस स्टेशन,मिरज यांना देण्यात आले.


यावेळी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकात खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष पवन उर्फ शिवाजी वाघमारे, मिरज शहर अध्यक्ष सतिश शिकलगार,चंद्रकांत सरवदे,राहुल श्रावस्ती, अनिल पवार, मधुकर शेस्वरे, हिरामण भगत, अनिल मोरे, इसाक सुतार, जावेद आलासे,प्रशांत बनसोडे, नझीर झारी, अतिश कांबळे आदी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆