=====================================
=====================================
वांगी | दि. 05 जानेवारी 2023
वांगी ता. कडेगांव येथील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासहा काँग्रेसने 14 जागा जिंकल्या होत्या
तर, काल झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत रामचंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
रामचंद्र शिंदे यांच्या निवडीमुळे तरून वर्गामधे मोठा उत्साह पहावयास मिळाला. निवडीनंतर उपसरपंच रामचंद्र शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वांनी स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मारक स्थळी जावून अभिवादन केले. यावेळी सरपंच सौ. वंदना सूर्यवंशी, बाबासो सूर्यवंशी, माझी सरपंच डॉ. विजय होनमाने, सर्व सदस्य, गजानन पोतदार,तारीफ शिकलगार, अमीर पटवेकरी, वैभव हडदरे, ऋषिकेश पोतदार,काकासो मोहिते, आशिफ पट्वेकरी, राजु मनेर, अविनाश देशमुख, कैलास कटरे, रितेश शहा, सोहेल शिकलगार यांच्यासह अनेक आजी माझी पदाधिकारी व तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆