======================================
======================================
कुंडल : ता.२२ जानेवारी २०२३
क्रांतिअग्रणी सेवकांची पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था असल्याने अल्पावधीत ती नावारूपाला आली आहे असे मत जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी व्यक्त केले.
ते कुंडल (ता.पलूस) येथील कारखाना स्थळावरील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या 19 व्या वर्धापन दिनी संचालक, सभासदांशी संवाद साधताना बोलत होते.
शरद लाड म्हणाले, पतसंस्था ही सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील महत्वाची भूमिका बजावते, त्यामुळे कमीत कमी कागदपत्रात सुलभ कर्जे दिली तर त्यांची निकड दूर होते, ठेवी आणि कर्जाचे प्रमाण समतोल ठेवल्याने ही पतसंस्था प्रगतीपथावर आहे. यामध्ये संचालक मंडळाने घेतलेल्या परिश्रमामुळे आज संस्था स्वतःच्या जागेत दिमाखात उभी आहे. भविष्यात अजून पारदर्शी व्यवहार करून संस्थेची प्रगती होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महारुद्र जंगम, अध्यक्ष मनोज लाड, उपाध्यक्ष कृष्णत माने,
विजय लाड, अजित घाडगे, सर्जेराव पवार, नागनाथ पाटील, अनिल जाधव, सुजित पाटील, जयकर पाटील, सचिव संभाजी पवार यांचेसह संचालक, सभासद उपस्थित होते.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या भेटीवेळी शरद लाड, मनोज लाड, कृष्णत लाड, विजय लाड आदी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆