======================================
======================================
भिलवडी | दि. १४ जानेवारी २०२३
भिलवडी (ता.पलूस) येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने मुठभर धान्य गरजूंसाठी उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांनी या उपक्रमास सहभाग घेऊन ७५ किलो धान्य संकलन केले गहू, तांदूळ अशा प्रकारचे संकलन केले हे धान्य आष्टा येथील आधार वृद्धाश्रमास देण्यात आले केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका सौ.देशमुख मँडम यांचेकडे सुपूर्त केले सौ.देशमुख मँडम संस्कार केंद्रास कृतज्ञता पत्र दिले.
या उपक्रमासाठी श्री.ह.रा.जोशी,श्री.बाळासाहेब माने सर ,श्री.सचिन सावंत,श्री.नंदू कांबळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्कार केंद्राचे वतीने गेली १५ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविला जातो आज पर्यत सुमारे ३० पोती धान्य वृद्धाश्रम, अनाथआश्रम ,गरजू कुटुंबे यांना देण्यात आलेले आहे संस्कार केंद्रातील विद्यार्थी दर आठवड्यास धान्य संकलन करतात व दर दोन महिन्यांनी ते धान्य गरजूंना दिले जाते. यावेळी आष्टा वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध आजी-आजोबा उपस्थित होते.त्यांच्याशी यावेळी संस्कार केंद्राचे वतीने संवादही साधण्यात आला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆