====================================
====================================
मिरज | दि. २३ जानेवारी २०२३
आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथील आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी - शिवसेना युतीची घोषणा करताच मिरजेत वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, पेढे साखर वाटप करून जल्लोष करण्यात आला. आगामी काळात निवडणुका वंचित बहुजन आघाडी - शिवसेना ताकदीने लढवेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे व शिवसेना मिरज शहर उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, चंद्रकांत खरात, नाझीरहुसेन झारी, रहीम कवठेकर, प्रमोद मल्लाडे, विशाल धेंडे, अनिल अंकलखोपे, मानतेश कांबळे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, अशोक लोंढे, प्रदीप कोलप, सूरज नांद्रे, सुनीता मोरे, आम्रपाली लोंढे, सिद्धार्थ लोंढे, परशुराम कांबळे, नईम डांगे, सोहेल सय्यद, समीर मुरसल, संकेत कोलप, राहील शेख, सुनील खरात, श्रीनिवास येसुमाळी, भिकाजी जाधव यासह वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे साखर वाटून आनंद साजरा...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆