=====================================
=====================================
सांगली | दि. २४ जानेवारी २०२३
सांगली जिल्ह्यातील अनेक गावामधील दलित वस्ती सुधार योजनेच्या कामामध्ये प्रचंड असा घोटाळा करण्यात आला आहे . दलित वस्ती सुधार योजनेची कामे पूर्णपणे निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील मातंग समाजाच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारीसो जिल्हा परिषद सांगली,गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार व अनेकदा आंदोलन करण्यात आली आहेत .परंतु चौकशी बाबत दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दलित वस्ती सुधार योजनेची कामे मातंग समाजामध्ये व्हावीत यासाठी दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी पोखर्णी तालुका वाळवा या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये प्रजासत्ताक दिना दिवशी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर इस्लामपूर गटविकास अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 18/10/2021 रोजी पर्दाफाश आंदोलन करण्यात आले .त्यानंतर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील मातंग समाजातील दलित वस्ती सुधार योजनेतून बांधलेले गटार व रस्त्याची चौकशी करावी. बेडग येथील मातंग समाज रहात असलेली जागा नावावर करण्यासाठी व दलित वस्तीतील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी . तासगाव तालुक्यातील उपळावी येथील मातंग समाजाला स्मशानभूमी व समाज मंदीर बांधून देण्यात यावे .जुळेवाडी तालुका तासगाव येथील मातंग समाज रहात असलेली जागा नावावर करुन त्या ठिकाणी शासनाच्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात .यासाठी जिल्हा परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले आहे .
1 नोव्हेंबर 2021 रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी,माळवाडी,अंकलखोप,पलूस,नागराळे,येथील दलित समाजाला सुविधा पुरवाव्यात यासाठी सुध्दा आंदोलन करण्यात आले आहे. 15आॅगस्ट 2021 रोजी तासगाव तहसिलदार कार्यालय व इस्लामपूर तहसिल कार्यालय व गटविकास अधिकारी यांच्या समवेत विकास कामाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली परंतु कोणत्याही प्रकारे अमंलबजावणी झालेली नाही.गेल्या दोन महिन्यापूर्वी सांगली जिल्हापरिषद कार्यालया समोर , जिल्ह्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची चौकशी व्हावी व संबधित ठेकेदार उप अभियंता ,ग्रामसेवक ,सरपंच यांची खातेनिहाय्य चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.परंतु सांगली जिल्ह्याचे शासन व प्रशासन या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.म्हणूनच
दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनाचे दिवशी तीव्र असे आंदोलन करणेत येणार आहे.याची शासन व प्रशासन यंत्रणेने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा लेखी निवेदनाद्वारे इशारा डी.पी.आय.च्या वतीने देण्यात आला आहे.
अशी माहिती जमीन झोपडी हक्क अभियान राज्यप्रमुख अशोकराव वायदंडे यांनी दिली आहे.
यावेळी दिलीप कुरणे राज्य संघटक , सतिश लोंढे पश्चिम म. अध्यक्ष , नंदकुमार नांगरे राज्य उपाध्यक्ष , विक्रम मोहिते मिरज ता. युवक अध्यक्ष , ओंकार काटे उपाध्यक्ष मिरज तालुका यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆