👇
=====================================
=====================================
आष्टा | दिनांक 30/01/2023
सांगली येथील पुष्पराज चौकातील साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना काही जातीयवादी ,मनुवादी विचाराच्या समाजकंटका कडून रंग (कलर) टाकून करण्यात आली होती.सदर विटंबना करणार्या आरोपीना चार दिवसात सांगली पोलीसानी अटक केली आहे. सांगली पोलीसाचे आम्ही अभिनंदनच करतो . परंतु विटंबना घडविण्यामागे जो कोण सुत्रधार आहे त्याचा शोध घेण्यात यावा.व त्याचेवर सुध्दा कारवाई करुन त्या सुत्रधारावर देशद्रोह्याचे गुन्हे दाखल करुन त्यानी फाशीची शिक्षा देण्यात यावी .अन्यथा आम्ही पक्षाच्या वतीने व आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करुन शासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येईल.
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यानी कष्टकरी,दलित,उपेक्षित पिडीत वर्गाच्या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्या अजरामर साहित्यात उमटविले आहे.जगण्यासाठी लढणार्या शोषित लोंकाचे वास्ववादी जीवन त्यानी आपल्या साहित्यातून जगासमोर मांडले आहे. जगातील सत्तावीस भाषांमध्ये अनुवादीत झालेल्या त्यांच्या साहित्याचा अभ्यास करुन अनेकानी डाॅक्टरेट पदव्या मिळविल्या आहेत. गोवा मुक्ती संग्राम ,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान मुंब ईतील गिरणी कामगारांसाठीचे कार्य सर्वज्ञान आहे. मानवता वादाचे पुरस्कर्ते ,पुरोगामी विचारानी जगलेले अण्णा भाऊ मातंग समाजाचे प्रेरणास्थान आणि अस्मिता आहेत. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करुन या अस्मितेवरच घाव घालण्याचे काम या समाज कंटक आरोपीनी केले आहे.त्यामुळे समाजात असंतोष पसरला आहे.
प्रशासनाने समाजाच्या तीव्र व संतप्त भावना लक्षात घेऊन सामाजिक अशांततेला कारणीभूत ठरलेल्या समाज घातक विटंबना करणाऱ्या आरोपींना व त्यामागील मुख्य सुत्रधाराला तात्काळ अटक करण्यात यावी.
मागण्या खालीलप्रमाणे
1) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी (दाम्पत्य) यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.व त्यांचेवर देशद्रोही गुन्हे दाखल करण्यात यावेत.
2) पुतळा विटंबना घडविण्यामागे जो कोणी सुत्रदार आहे .त्याचा तात्काळ तपास करुन त्याच्यावरही देशद्रोही गुन्हे दाखल करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
3) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळ्यास कायम स्वरुपी पोलिस संरक्षण देण्यात यावे .
इत्यादी मागण्यांसाठी दि.३० जानेवारी रोजी वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अप्पर तहसिलदार कार्यालया समोर निदर्शने करुन अप्पर तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल याची शासन व प्रशासन यंत्रणेने नोंद घ्यावी असा इशारा देखील यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने देण्यात आला.
सदरचे आंदोलन हे डी.पी.आय,दलित महासंघ, आर.पी.आय, व भाजप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी अशोकराव वायदंडे ,जहाल नेते DPI
सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ,नंदकुमार नांगरे राज्य उपाध्यक्ष , दिलीप कुरणे राज्य संघटक , प्रदिप आवळे शहर अध्यक्ष आर पी आय , सिमाताई आवळे जिल्हाध्यक्षा दलित महासंघ , रमेश आवळे संघटक वाळवा ता. DPI , अनिल थोरात.(शहर अध्यक्ष ) दलित महासंघ यांच्या सह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆