yuva MAharashtra उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे



======================================
======================================

मुंबई | दि. 04 जानेवारी 2023

महावितरण कर्मचाऱ्यांचा  संपाचा आज पहिला दिवस होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. 
 4,5,आणि 6 जानेवारी 2023 पर्यंत 
महावितरणच्या तीन कंपन्यामधील कर्मचार्यांनी महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील महावितरण  कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. या संपामध्ये कंत्राटी कर्मचारी सुध्दा सहभागी झाले होते.
आज विज कर्मचारी संघटनांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली.
राज्य सरकार महावितरण कंपन्यांचे कोणतेही खासगी करण करणार नाही. यासह इतर मागण्यांचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महावितरण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆