yuva MAharashtra The JanShakti News

No title




======================================
======================================

सांगली | दि.१० जानेवारी २०२३

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत तीन तसेच पाच वर्ष विधी अभ्यासक्रम मधील प्रथम वर्ष सत्र दोनची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी संपलेली आहे. गेले दोन महिन्यापासून विद्यार्थी घरात बसून आहेत. यानंतरचे पुढील शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरू झालेले नाही. या परीक्षेचा निकाल २१ डिसेंबर रोजी विद्यापीठाने जाहीर केला पण अनेक विधी महाविद्यालयांचा निकाल पात्रते अभावी राखून ठेवलेला आहे. राज्य सामाईक पूर्व परीक्षा अर्थात सीईटी सेल यांनी एडमिशन प्रक्रिया पार पडताच पात्रता बाबतची अधिकृत यादी शिवाजी विद्यापीठाकडे वर्ग करणे हे महाराष्ट्र शासनाचे काम होते, पण तसे न केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ मार्फत राखून ठेवलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची निकालाची प्रत मिळत नाही, प्रसंगी पुढील शैक्षणीक वर्षाची एडमिशन प्रक्रिया, स्कॉलरशिप व इतर शैक्षणिक सवलती बाबत दिरंगाई होत आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी हमी पत्र भरून दिलेले असताना देखील निकाल राखून ठेवलेला आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केली.



उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ
शिवाजी विद्यापीठ मार्फत विविध अभ्यासक्रमाचे युजीसी नियमानुसार ९० दिवस अध्यापन केले जात नसल्याची तक्रार विद्यार्थी वर्गाकडून होत आहे. अनेक आंदोलन , उच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. या अनागोंदी कारभारास उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच शिवाजी विद्यापीठ जबाबदार आहेत. पुढील सत्र कधी सुरू होणार, परीक्षा कधी होणार, आदींबाबत सविस्तर परिपत्रक काढावे अशी मागणी अमोल वेटम यांनी राज्यपाल यांना केली आहे.

अमोल वेटम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆