yuva MAharashtra समर्थ प्रशिक्षण केंद्रात अनिता लवटे व रेणुका लोणारे प्रथम... समर्थ प्रशिक्षण केंद्रचा शंभरटक्के निकाल..

समर्थ प्रशिक्षण केंद्रात अनिता लवटे व रेणुका लोणारे प्रथम... समर्थ प्रशिक्षण केंद्रचा शंभरटक्के निकाल..




=====================================
=====================================

सांगोला | दि. 14 जानेवारी 2023

महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सांगोला या केंद्रात डिसेंबर 2022 मध्ये घेतलेल्या मोंटेसरी सुपरवायझर व मोंटेसरी शिक्षिका या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समर्थ प्रशिक्षण विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.


 यामध्ये मोंटेसरी सुपरवायझर या परीक्षेत अनिता शिवाजी लवटे यांचा 87.25% गुण मिळवून व मोंटेसरी शिक्षिका परीक्षेमध्ये रेणुका शरणू लोणारे यांचा 82.75%विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
      
समर्थ प्रशिक्षण केंद्रात अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, अंगणवाडी मदतनीस, पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होत असते. प्रशिक्षण केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. यामध्ये योग्य मार्गदर्शन व प्राध्यापकाचे अध्यापन कौशल्य याचाही मोठा सहभाग आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, प्राचार्य प्रशांत मिसाळ,सहशिक्षिका भाग्यश्री घुले,सोमेश्वरी फंड संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,सचिव प्रमिला साळुंखे,खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह पालकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆