yuva MAharashtra राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त भिलवडी व परिसरातील पत्रकारांचा सन्मान...

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त भिलवडी व परिसरातील पत्रकारांचा सन्मान...

  

➡️                          *व्हिडीओ पहा*
                                         👇



====================================
====================================

भिलवडी | दि. 07 जानेवारी 2023
 
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त  भिलवडी तालुका पलुस येथे दिनांक ६ जानेवारी  रोजी  विविध संस्था , संघटना , पोलीस ठाणे , वाचनालय व पक्ष कार्यालय  यांच्या वतीने भिलवडी व परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
  
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने भिलवडी उपकेंद्र येथे केंद्र प्रमुख मीरा बेहनजी यांनी  पत्रकारांचा सन्मान केला. 
   
    भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने  सरपंच विद्या पाटील , उपसरपंच पृथ्वीराज पाटील , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य , माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील , सांगली जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बी.डी.पाटील , माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे , ऐन्नुद्दीन  जमादार यांच्या सह आदी मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला.

 यावेळी भिलवडी पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्ती झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचा देखील सत्कार ग्रामपंचायत व समस्त भिलवडीकरांच्या  वतीने संग्राम दादा पाटील व बी.डी.पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
 
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज व खाजगी प्राथमिक मराठी मुलांची शाळा भिलवडी येथे संस्थेचे संचालक संजय कदम यांच्या उपस्थितीत सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,सुकुमार किणीकर यांच्या सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

व्यापारी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर ,उपाध्यक्ष रणजित पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे जावेद तांबोळी , दिलावर डांगे , राजेंद्र तेली , विशाल सावळवाडे , दिलीप पाटील यांच्या सह आदी संचालक उपस्थित होते.

 प्रतिवर्षी प्रमाणे सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने भिलवडी व परिसरातील सर्व पत्रकारांचा ग्रंथ भेट देऊन  सत्कार करण्यात आला. यावेळी  उद्योजक गिरीश चितळे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे संचालक कवी डॉ. प्रदीप पाटील, अविष्कार कल्चरल ग्रुपचे सुनिल चव्हाण, साहित्यिक सुभाष कवडे, भू.ना.मगदूम , जयंत केळकर, जी. जी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी  डॉ. प्रदीप पाटील आणि गिरीश चितळे यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

भिलवडी येथील कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालय व  राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी देखील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात सुभाष अरबूने व मारुती हराळे यांच्या हस्ते  तर  राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात पलूस तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पाटील , ग्रामपंचायत माजी सरपंच धनंजय पाटील , तानाजी मोकाशी , नितीन मोरे यांच्या सह आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.


 भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शहाजी (भाऊ) गुरव यांच्या वतीने भुवनेश्वरीवाडी येथे   उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते तर भिलवडी पोलीस ठाणे च्या वतीने नवनिर्वाचित साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
---------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆