=====================================
=====================================
कुंडल | दि. २४ जानेवारी २०२३
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू )लाड ह्यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभानिमित्त शुक्रवार दि. 27 जानेवारी 2023 रोजी क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड यांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण व पुतळा आणवरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार ह्यांच्या हस्ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्याचे आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी स्मृतिस्थळ लोकार्पण सोहळा, क्रांतिअग्रणी व क्रांतिसिह यांच्या पुतळ्यांचे अनावरण ही याच दिवशी होणार आहे.
तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ह्यांचे 2021 - 2022 हे जन्मशताब्दी वर्ष विविध समाजोपयोगी व प्रबोधनपर उपक्रमांनी साजरे करण्यात आले. विशेषतः सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांचे विचार आणि आचार नवीन पिढीला माहिती व्हावेत, त्यांनी जगलेल्या खडतर आयुष्याची माहिती व्हावी यासाठी नामवंत वक्त्यांची भाषणे, पलूस व कडेगाव तालुक्यात प्रबोधनपर प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने, चित्रकला स्पर्धा, चित्ररथ स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, विविध सांघिक खेळ स्पर्धांचे आयोजन, सायक्लोथॉन, जन्मशताब्दीचे औचित्य साधून शंभर निराधार महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे आदी उपक्रम राबविण्यात आले. सर्वच उपक्रमांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला.
क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांच्या स्मारकाचे उद्घाटन 2008 मध्ये करण्यात आले होते. परंतु क्रांतिसिंहाच्या पुतळ्याचे काम निधीअभावी रखडलेले होते, त्यामुळे आम्ही अशी भूमिका घेतली की, जोपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांचा पुतळा उभा होणार नाही तोपर्यंत क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंच्या स्मारकाचे उद्घाटन घेणार नाही आणि त्यादृष्टीने सतत पाठपुरावा करून शासनाकडून क्रांतिसिंहाच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध केला आणि आज दोन्ही पुतळ्यांच्या अनावरण होत आहे.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी सांगता समारंभ सोहळ्या निमित्त क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ह्यांच्या स्मारकाचा लोकार्पण समारंभ, क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंच्या स्मारकातील पुतळ्यांचे अनावरण, तसेच क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सहयोगाने कारखाना स्थळावर बांधण्यात आलेल्या समाधीस्थळाचा लोकार्पण समारंभ संपन्न होणार आहे.
तसेच क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी समितीच्या वतीने साकारण्यात आलेल्या "क्रांतदर्शी" या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी स्मृतिग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना विस्तारीकण गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वरील सर्व कार्यक्रम खासदार शरदचंद्र पवार ह्यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपालखासदार श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील,आमदार मानसिंगराव नाईक, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हाधीकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, श्रीकांत लाड, जगन्नाथ आवटे, अशोक पवार, दिनकर लाड, संजय मदने यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆