======================================
======================================
सांगली | दि.२५ जानेवारी २०२३
सांगली जिल्हयातील सन २०२१-२२ पासून नागरिकांचे वापरणेत येणारे मोबाईल संच ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबतचा मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगली सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अमंलदार यांचेकडुन माहिती घेवुन सांगली जिल्हयातुन गहाळ झालेल्या मोबाईल संचाची तसेच चोरीच्या गुन्हयात गेलेले मोबाईल संच यांची सायबर पोलीस ठाणे मार्फत तांत्रिक तपासाच्या आधारे शोध मोहीम राबवुन जास्तीत जास्त मोबाईल नागरिकांना परत करावेत याबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस उपनिरिक्षक रोहीदास पवार, सांगली सायबर पोलीस ठाणे यांनी पोलीस अमलदार सचिन कोळी, अजय पाटील, कॅप्टनसाहेब गुंडवाडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेकडील सचिन कनप, विकास भोसले, राहुल लोखंडे यांचे पथक तयार करून गहाळ झालेले मोबाईल संच शोधणे कामी नेमणेत आले. नमुद पथकांनी तांत्रिक तपास करून कर्नाटक राज्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयातुन अंदाजे १५,००,०००/- रुपये किंमतीचे एकुण ११० मोबाईल संच शोधुन ते ताब्यात घेणेत पोलीस पथकास यश आले आहे.
सदरची मोहीम मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक रोहीदास पवार, पोलीस अमलदार करण परदेशी, महादेव घेरडे, अमिन सय्यद, संदिप पाटील, प्रकाश पाटील, सचिन कोळी, अजय पाटील, अमोल क्षिरसागर, कॅप्टनसाहेब गुंडवाडे, सुनिल मदने, स्वप्निल नायकवडे, विवेक सांळुखे, श्रीधर बागडी स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेकडील पोलीस अमंलदार सचिन कनप, विकास भोसले, राहुल लोखंडे, इस्लामपुर पोलीस ठाणेकडील पोलीस अमलदार अमोल सावंत, अलमगीर लतीफ, मिरज शहर पोलीस ठाणे कडील सचिन सनदी, कडेगांव पोलीस ठाणे कडील पोलीस अमंलदार शिवाजी माळी, आष्टा पोलीस ठाणे कडील अमोल शिंदे, नितीन पाटील, शिराळा पोलीस ठाणेचे पोलीस अमलदार नितीन यादव, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बसवराज कुंदगोळ, विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पोलीस अमलदार धिरज यादव यांनी मदत केली आहे.
दिनांक २४.०१.२०२३ रोजी ज्या लोकांचे मोबाईल फोन मिळुन आले आहेत, त्या नागरिकांना मोबाईल फोनची व त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवुन मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार व सायबर पोलीस ठाणेचे सर्व पोलीस अमलदार यांचे उपस्थितीत त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले.
नागरीकांना त्यांचा हरवलेला मोबाईल फोन मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल फोन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन सांगली पोलीस दलाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे नागरिकांना मोबाईल फोन परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून आला. सांगली सायबर पोलीस ठाणे कडुन नागरिकांना ही प्रजासत्ताक दिनाची अनोखी भेट देण्यात आली आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पथकाचे अभिनंदन करून भविष्यात देखील सायबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल फोन नागरीकांना परत करण्यातबाबत सुचना दिल्या असुन ही मोहीम भविष्यात देखील सतत राबविण्यात येणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆