➡️ *व्हिडीओ पहा*
👇
======================================
======================================
वसगडे | दि. ०१ फेब्रुवारी २०२३
गरजू व्यक्तीला मदत करण्याच्या उद्देशाने सामाजिक दृष्टीकोनातून पलूस तालुक्यातील जय भारत विद्यालय वसगडे येथील माजी विद्यार्थी (बॅच 2001) यांनी,एक सामाजिक बांधिलकी जपत मिरज येथील 'माहेर आश्रम,ला कपडे आणि किराणा माल देऊन " एक हात मदतीचा " उपक्रम राबविला.
पीडित महिलांच्या आणि मुलांच्या आश्रमाला मदत करायची या दृष्टीने व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे वर्गमित्रांना Google pay च्या माध्यमातून जमेल तशी मदत करण्याचे आवाहन केले असता. त्या आवाहनाला वर्गमित्रांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला व काही रक्कम जमा झाली त्यातून त्यांनी अनाथ व पीडित महिलांचे 'माहेर आश्रम, मिरज ' येथे मदत करायचे ठरवले . तेथील महिला व मुलांसाठी नवीन कपडे आणि त्यांना रोज साठी लागणारा किराणा सामान अशी खरेदी केली .
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ही मदत 'माहेर आश्रम ' येथे पोहोच केली .माहेर आश्रम मिरज चे प्रमुख केअरटेकर श्री.अभिजित कांबळे ,यांनी आश्रम बद्दल माहिती दिली .काही परिस्थिती मुळे या महिला इथेपर्यंत येतात व त्यांची कशाप्रकारे काळजी घेतली जाते व त्यांना बरे केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त केले जाते. याबद्दल माहिती दिली.
अशा प्रकारे कार्य करून एक चांगले उदाहरण जयभारत विद्यालय वसगडे येथील माजी विद्यार्थ्यांनी समाजासमोर घालून दिले आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆