फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांचे आवाहन...
=====================================
=====================================
सांगली | दि.१० फेब्रुवारी २०२३
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते, अमित गायकवाड संघटक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर वंचित, शोषित, पिडीत कष्टकरी वर्ग व संघटीत असंघटित सर्व क्षेत्रातील कामगारांना एकसंघ करून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे सांगली जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील संघटन बांधणी अधिकाधिक मजबूत करून नवीन कार्यकर्त्यांना संधी निर्माण करून सर्व क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक उन्नती व न्याय हक्कासाठी लढा उभे करणे कामी उद्या शनिवार दि. ११/०२/२०२३ रोजी दुपारी २.०० वा. शासकीय विश्रामगृह, विश्रामबाग सांगली या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी निवड करणेसाठी मुलाखतीचे आयोजन केले आहे.
मुलाखतीसाठी पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांत वाघमारे व सांगली जिल्हा निरिक्षक आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रा. रणजीत जाधव, तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व किर्तीकर शिवशरण यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
सांगली जिल्हयातील फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मा. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक संघ होवून सहभागी व्हावे असे आवाहन सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●