yuva MAharashtra नागरिकांमध्ये आर्थिक व डिजीटल साक्षरता निर्माण झालेला देश शाश्वत अर्थिक विकास करेल..डॉ.संजय ठिगळे

नागरिकांमध्ये आर्थिक व डिजीटल साक्षरता निर्माण झालेला देश शाश्वत अर्थिक विकास करेल..डॉ.संजय ठिगळे




=====================================
=====================================

भिलवडी | दि १२ फेब्रुवारी २०२३

नागरिकांमध्ये आर्थिक व डिजीटल साक्षरता निर्माण झालेला देश शाश्वत  अर्थिक विकास करेल असे प्रतिपादन   प्रसिद्ध वक्ते व अर्थतज्ञ डॉ.संजय ठिगळे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने वाचनालयाचे दिवंगत अध्यक्ष  उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त  ग्रामीण भागाचे बदलते  अर्थकारण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते.
यापुढे बोलताना, 


 ठिगळे म्हणाले की,आरोग्य व शिक्षणावर जो देश जास्त खर्च करतो तो देश आर्थिक विकास साधू शकतो.भारतासारखा स्वस्त आणि मस्त देश जगात नाही.शेतीला वीज,पाणी,व शेतीला कमी व्याजात कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे.
  

यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था शेती व शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांची आहे.अर्थ व्यवस्थेत वारंवार होणाऱ्या बदलांचा व ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.

डी.आर.कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यवाह सुभाष कवडे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी मकरंद चितळे, जी.जी.पाटील, भूपाल मगदूम,डॉ.जयकुमार चोपडे,रमेश चोपडे,पुरुषोत्तम जोशी,संजय कदम,सुबोध वाळवेकर,प्रा.महेश पाटील,संपतराव तोरसकर आदी उपस्थित होते.



भिलवडी येथे व्याख्यान प्रसंगी बोलताना डॉ.संजय ठिगळे,गिरीश चितळे आदी.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


-------------------------------------------------------------------

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆